Weight Loss : वजन कमी करायचंय, कोणतं धान्य खावं कळत नाही? नाचणी, गहू की बेसन.. पाहा बेस्ट पर्याय कोणता
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Best grain for weight loss : आजकाल वजन कमी करण्याचा विचार करताना सर्वात आधी आहाराकडे लक्ष दिलं जातं. विशेषतः रोजच्या जेवणात असणारी पोळी किंवा भाकरी वजन वाढवते की कमी करते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आपण लहानपणापासून खात असलेली गव्हाची चपाती योग्य आहे की नाचणी, बेसनसारखे पर्याय जास्त फायदेशीर आहेत? याबाबत बरीच संभ्रमावस्था असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणता धान्यप्रकार जास्त उपयुक्त ठरतो, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
advertisement
1/9

वजन कमी करताना फक्त कमी खाणं पुरेसं नसतं तर योग्य पोषणमूल्य असलेलं अन्न निवडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन आणि ग्लायसेमिक इंडेक्स यांचा समतोल साधला तर वजन कमी करणं सोपं होतं. चला तर मग गव्हाची चपाती, नाचणीची भाकरी आणि बेसनाची चपाती यांची तुलना करून पाहूया.
advertisement
2/9
गव्हाची चपाती : आपल्या घरात रोजच्या जेवणात गव्हाची चपाती हमखास असते. गहू स्वस्त, सहज उपलब्ध आणि पोटभरणारे असते. मात्र वजन कमी करण्याच्या दृष्टीने पाहिलं तर गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही तुलनेने जास्त असल्यामुळे चपाती खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते आणि थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते. त्यामुळे केवळ गव्हाच्या चपात्यांवर अवलंबून राहिल्यास वजन कमी करणं कठीण होऊ शकतं.
advertisement
3/9
नाचणीची भाकरी : नाचणी म्हणजेच रागी आजकाल ‘सुपरफूड’ म्हणून ओळखली जाते. वजन कमी करण्यासाठी नाचणी हा उत्तम पर्याय मानला जातो. कारण यात फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. फायबरमुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे ओव्हरईटिंग टाळता येतं. याशिवाय नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांसाठीही ते फायदेशीर ठरतं.
advertisement
4/9
नाचणीचा वजनावर होणारा परिणाम : नाचणीची भाकरी नियमित खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वजन कमी करत असताना अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या जाणवते. अशा वेळी नाचणी खूप उपयोगी ठरते. शिवाय नाचणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
advertisement
5/9
बेसनाची चपाती : बेसन म्हणजे चण्याचं पीठ. वजन कमी करण्यासाठी बेसन हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. कारण यात प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं. प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते. बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे इन्सुलिन लेव्हल नियंत्रणात राहते आणि फॅट साठण्याची शक्यता कमी होते.
advertisement
6/9
वर्कआउट करणाऱ्यांसाठी बेसन का उपयुक्त : जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांच्यासाठी बेसनाची चपाती फायदेशीर ठरते. प्रोटीनमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि मसल रिकव्हरी जलद होते. त्यामुळे वजन कमी करतानाच शरीर टोन होण्यासही मदत होते.
advertisement
7/9
नेमका कोणता पर्याय सर्वोत्तम : तुलना केली तर नाचणी आणि बेसन हे दोन्ही गव्हाच्या तुलनेत वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. पोट भरणं, पचन सुधारणं आणि भूक नियंत्रणात ठेवणं यासाठी नाचणी उत्तम आहे तर प्रोटीनची गरज आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी बेसन योग्य ठरते.
advertisement
8/9
मल्टीग्रेन आटा आहे बेस्ट : सर्वात चांगला मार्ग म्हणजे फक्त एका प्रकारच्या पिठावर अवलंबून न राहता, गव्हाच्या पिठात थोडं नाचणी आणि बेसन मिसळून मल्टीग्रेन आटा तयार करा. यामुळे चवही टिकून राहते, पोषणमूल्य वाढतात आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. योग्य प्रमाणात आणि समतोल आहार घेतला तर वजन कमी करणं नक्कीच सोपं होऊ शकतं.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss : वजन कमी करायचंय, कोणतं धान्य खावं कळत नाही? नाचणी, गहू की बेसन.. पाहा बेस्ट पर्याय कोणता