Snake Fact : हिवाळ्यात साप अचानक कुठे गायब होतात? दिवसा की रात्री कधी घेतात झोप, सापांचे काही रंजक सत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
why snake disappear in Winter : तुम्ही कधी विचार केला आहे का, की जसा हिवाळा सुरू होतो आणि हवेत गारवा वाढतो, तसे हे साप अचानक कुठे गायब होतात?
advertisement
1/8

उन्हाळा किंवा पावसाळा असला की, घराच्या आजूबाजूला, शेतात किंवा बागेत सापांचा वावर वाढल्याच्या बातम्या आपण रोजच ऐकतो. पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडतात आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जसा हिवाळा सुरू होतो आणि हवेत गारवा वाढतो, तसे हे साप अचानक कुठे गायब होतात?
advertisement
2/8
थंडीच्या दिवसांत साप दिसेनासे होण्यामागे केवळ लपण्याची जागा शोधणे हे कारण नसून, त्यामागे एक रंजक जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे. सापांचे हे 'रहस्यमयी' आयुष्य आणि त्यांची झोप याबद्दलची ही रंजक माहिती तुम्हाला नक्कीच चकित करेल.
advertisement
3/8
रिवा येथील व्हेटर्नरी हॉस्पिटलचे प्रोफेसर डॉ. ए. के. मिश्रा यांच्या मते, साप हा एक शीत रक्ताचा (Cold-blooded) प्राणी आहे. याचा अर्थ असा की, साप स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतःहून नियंत्रित करू शकत नाहीत. जेव्हा बाहेर थंडी असते, तेव्हा त्यांच्या शरीरातील रक्त गोठू लागते. अशा परिस्थितीत त्यांना साधी हालचाल करणेही कठीण होऊन बसते.
advertisement
4/8
थंडीमुळे सापांच्या शरीरातील मेटाबॉलिझम (Metabolic rate) म्हणजेच चयापचय प्रक्रिया मंदावते. यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होणे बंद होते. भूक लागली असली तरी हालचाल न करता आल्यामुळे ते शिकार करू शकत नाहीत. ही अवस्था त्यांच्यासाठी अत्यंत कष्टदायक असते.
advertisement
5/8
या शारीरिक कष्टामुळे हिवाळ्यात सापांची मानसिक स्थिती थोडी चिडचिडी आणि आक्रमक असते. थंडीत ऊब मिळवण्यासाठी ते जेव्हा बाहेर येतात, तेव्हा ते एका प्रकारच्या धुंदीत असतात. अशा वेळी जर चुकूनही तुमचा पाय सापावर पडला, तर तो एकाच दंशात आपल्या दातांमधील सर्व विष माणसाच्या शरीरात सोडू शकतो.
advertisement
6/8
हिवाळ्याच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी साप 'हायबरनेशन' म्हणजेच 'शीतनिद्रे'त जातात. अस्वल किंवा इतर काही प्राण्यांप्रमाणेच सापही सुरक्षित आणि उबदार कोपरा शोधतात. घराचा एखादा कोपरा, पेंढ्याची पेंड (धान्याचे ढीग), लाकडांचे ढीग किंवा गुफा अशा ठिकाणी ते आश्रय घेतात. सामान्य दिवसांत साप 24 तासांपैकी 16 तास झोपतात. पण हिवाळ्यात हे प्रमाण 20 ते 22 तासांपर्यंत पोहोचते. अजगरासारखे मोठे साप तर अनेक दिवसांपर्यंत एकाच जागी न हालता पडून राहू शकतात.
advertisement
7/8
साप या काळात पूर्वी केलेल्या शिकारीतून मिळालेल्या ऊर्जेवर जगतात. ते आपली ऊर्जा वाचवण्यासाठी हालचाल टाळतात. म्हणूनच हिवाळ्यात ते सहसा कोणाला दिसत नाहीत. एकदा का थंडी कमी झाली आणि वातावरणात ऊब आली की, हे साप पुन्हा सक्रिय होतात.
advertisement
8/8
त्यामुळे हिवाळ्यात जरी साप कमी दिसत असले, तरी अडगळीच्या किंवा उबदार जागी हात घालताना किंवा चालताना सावध राहणे केव्हाही चांगले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Snake Fact : हिवाळ्यात साप अचानक कुठे गायब होतात? दिवसा की रात्री कधी घेतात झोप, सापांचे काही रंजक सत्य