TRENDING:

Do You Know : भारताशिवाय इतर कुठल्याही देशांत दूधाची चहा पित नाहीत, तुम्हाला माहितीय का?

Last Updated:
प्रत्येक देशात चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. काही देशांत चहा साधा आणि हलका बनवतात, तर काही देशांत त्यात वेगवेगळे साहित्य मिसळून चहा अधिक स्वादिष्ट केला जातो.
advertisement
1/8
भारताशिवाय इतर कुठल्याही देशांत दूधाची चहा पित नाहीत, तुम्हाला माहितीय का?
चहा हे असं पेय आहे जे जगभरातीय लोक पितात. आशिया खंडात मात्र बहुतांश लोक चहा पितात. हे अनेकांचं वेलकम ड्रिंक देखील आहे. प्रत्येकाला आपल्या चवीप्रमाणे चहा आवडतो कोणाला आल्याचा चहा, कोणाला वेलची टाकलेला, कुणाला गवती चहा आवडतो. यासगळ्यात असे ही काही लोक आहेत जे विना दुधाचा चहा पितात.
advertisement
2/8
प्रत्येक देशात चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. काही देशांत चहा साधा आणि हलका बनवतात, तर काही देशांत त्यात वेगवेगळे साहित्य मिसळून चहा अधिक स्वादिष्ट केला जातो. भारतात मात्र चहा दूध आणि साखरेसह बनवला जातो, जो जगभरातल्या चहा पेयांपेक्षा वेगळा आणि खास आहे. पण मग असा प्रश्न उपस्थीत रहातो की भारतीय लोक दुध टाकून का चहा पितात? ही पद्धत कुठून आणि कशी आली?
advertisement
3/8
चहा मूळतः भारतात तयार झाला नव्हता. तो 19व्या शतकात इंग्रजांसोबत भारतात आला. ईस्ट इंडिया कंपनीने चीनच्या चहा व्यापारावर स्पर्धा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चहा लागवड सुरू केली. सुरुवातीला चहा फक्त निर्यातीसाठी आणि ब्रिटिश उच्चवर्गासाठी तयार केला जात होता, सामान्य भारतीयांसाठी नव्हता.
advertisement
4/8
1900च्या दशकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी भारतीयांना चहा पिण्यास प्रोत्साहन दिले. चहा अधिक आकर्षक करण्यासाठी दूध आणि साखर घालण्याचा सल्ला दिला. हा उपाय यशस्वी ठरला आणि भारतीयांनी फक्त इंग्रजांच्या पद्धती स्वीकारल्या नाहीत, तर त्यांना स्वतःचा अंदाजही दिला. काही काळातच चहा सगळ्यांच्या रोजच्या दिवसाचा भाग बनला.
advertisement
5/8
दूध भारतीय चहा खास बनवणारभारतामध्ये दूध हे सर्व स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अनेक पेय आणि गोड पदार्थांमध्ये दूध महत्त्वाची भूमिका बजावतो. चहा तयार करताना दूध चहा मलाईदार आणि स्वादिष्ट बनवते. त्यात साखर घालल्यास चहाचा स्वाद आणखी वाढतो. त्यामुळे चहा केवळ पेय राहिले नाही, तर आरामदायक अनुभव बनला.
advertisement
6/8
जसे-जसे चहा संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला, तसे प्रत्येक भागात नवीन चहा प्रकार तयार झाले. काहींनी आलं घालून तिखटपणा आणला, तर काहींनी वेलची, लवंग, दालचिनी घालून स्वाद वाढवला. दूध आणि मसाल्यांचे मिश्रण मिळून त्याने मसाला चहा बनवले.
advertisement
7/8
20व्या शतकाच्या मध्यापर्यंत, चहा दुकाने आणि चहावाले रोजच्या जीवनाचा भाग बनले. रेल्वे स्टेशनपासून शहराच्या नुक्कडांपर्यंत, चहा मिळणार्‍या दुकानांनी आपल्या उपस्थितीने लोकांना आकर्षित केले. विद्यार्थी, कामगार आणि प्रवासी सर्वजण या दुकांनामध्ये थांबून चहा घेत होते. विविध भाषा, धर्म आणि प्रदेशांमधील लोक चहा पिऊन एकत्र येत, यामुळे सामाजिक जुळवणूकही झाली.
advertisement
8/8
चीन, जपानसारख्या देशांत चहा संस्कृती प्राचीन आहे. तिथे चहा शुद्ध आणि फोकस्ड असतो. इथे चहाच्या पानांवर जास्त लक्ष दिले जाते. त्यांना चहा गोड करणे किंवा जास्त कॅलोरी घालणे महत्त्वाचे वाटत नाही. इंग्रज मात्र थोडे दूध घालतात, पण खूपच कमी प्रमाणात.युरोपात चहा हलका आणि सौम्य असतो, तर भारतात चहा जाडसर, बोल्ड आणि सामाजिक बनवला गेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Do You Know : भारताशिवाय इतर कुठल्याही देशांत दूधाची चहा पित नाहीत, तुम्हाला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल