TRENDING:

Jackfruit Health benefits: ‘हे’ काटेरी फळ काढतं अनेक आजारांचा ‘काटा’, कॅन्सरसारखे गंभीर आजारही पळतात दूर

Last Updated:
Health benefits of Jackfruit in Marathi: फणस हे उष्णकटिबंधीय फळ आहे. किनारपट्टी भागात फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. राज्यात कापा आणि बरका असे फणसाचे दोन मुख्य प्रकार आढळून येतात. फणसाच्या पिवळसर गऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्वं आढळून येतात. कोकणासह अनेक ठिकाणी फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवली जाते. त्यामुळे फणस हे नेमकं फळ की भाजी अशी चर्चा देखील नेहमी होत असते. जाणून घेऊयात फणसाचे आरोग्यदायी फायदे.
advertisement
1/7
Jackfruit benefits: ‘हे’ काटेरी फळ काढतं अनेक आजारांचा ‘काटा’, कॅन्सरही घाबरतो
कोकण किनापट्टीसह दक्षिण-पश्चिम भारतात फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. फणसाचं शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटेरोफायलस आहे. फणस हे आकाराने मोठं असल्याने जगातील सर्वात मोठ्या फळांमध्ये फणसाची गणना होते.
advertisement
2/7
फणसामध्ये लिग्नांस, आयसोफ्लाव्होन सॅपोनिन्स यासारखे फायटोन्यूट्रिएंट्स असतात. जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस हा एक रामबाण पर्याय ठरतो.
advertisement
3/7
फणसात फायबर्सही चांगल्या प्रमाणाच आढळून येतं. त्यामुळे आतडे आणि पोट आतून स्वच्छ होऊन शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. याशिवाय फायबर्समुळे गॅसेस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेसारख्या आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
4/7
फणसात भरपूर प्रमाणात लोह असतं. त्यामुळे फणस खाल्ल्यामुळे शरीरातली लोहाची कमतरता भरून निघते. त्यामुळे ॲनिमिया असलेल्या व्यक्तींसाठी किंवा स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये फणस खाल्ल्याने त्यांना फायदा होऊ शकतो.
advertisement
5/7
डायबिटीज असलेल्या रूग्णांसाठी फणस हे एक वरदान आहे. फणस खाल्ल्याने किंवा फणसाच्या गरे वाळवून त्यांची पावडर करून खाल्ल्याने किंवा फणसाची पानं गरम पाण्यात उकळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहायल मदत होते.
advertisement
6/7
फणसात तांबं चांगल्या प्रमाणात आढळून येतं. आपल्याला माहितीच आहे की, तांब्याच्या कमतरतेमुळे थायरॉईडचा त्रास वाढू शकतो. याशिवाय फणसात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांसाठी फणस हे औषदापेक्षा कमी नाहीये.
advertisement
7/7
फणसात अँटिऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखी पोषकतत्वं आढळून येतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण होऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jackfruit Health benefits: ‘हे’ काटेरी फळ काढतं अनेक आजारांचा ‘काटा’, कॅन्सरसारखे गंभीर आजारही पळतात दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल