TRENDING:

संक्रांतीला खरेदी करा फक्त 400 रुपयांत साडी; पुण्यातील 'या' बाजारपेठेत अनेक प्रकार उपलब्ध

Last Updated:
मकर संक्रांतीला नेसण्यात येणाऱ्या काळ्या रंगाच्या साड्यांसाठी निरनिराळ्या साड्यांचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
1/6
संक्रांतीला खरेदी करा फक्त 400 रुपयांत साडी; ‘या’ बाजारपेठेत अनेक प्रकार उपलब्ध
मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
advertisement
2/6
नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात. यंदा पुण्यातील बाजारपेठेत काळ्या साडीचे नेमके कुठले कुठले प्रकार आले आहेत हे जाणून घेऊया.
advertisement
3/6
पुण्यातील रविवारपेठ या ठिकाणच्या साड्यांच्या दुकानात संक्रांती निमित्त काळ्या साड्या अगदी कमीतकमी म्हणजेच 400 रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहेत. मकर संक्रांतीला नेसण्यात येणाऱ्या काळ्या रंगाच्या साड्यांसाठी निरनिराळ्या साड्यांचे पर्याय आहेत.
advertisement
4/6
ज्या तुम्ही रथसप्तमीपर्यंत अनेक घरगुती आणि सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभांना नेसू शकता. अगदी पारंपरिक साड्यांपासून ते अगदी मॉर्डन डिझाईनर साड्यांपर्यंतचे विविध पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.
advertisement
5/6
यामध्ये तुम्हाला साड्यांची महाराणी पैठणी, बनारसी साडी, कतान सिल्क, कॉटन सिल्क चंदेरी साडी, कांचीपुरम साडी, मदुराई सिल्क साडी, प्युअर सिल्क टसर साडी, टसर सिल्क विथ कांथावर्क, मुंगा वर्क, हॅन्डवूव्हन सिल्क साडी, चेक्स डिझाईन साडी, रॉ सिल्क साडी, कॉटन साडी, जॉर्जेट आणि डिझानर ब्लाऊज, डिझानर साडी असे अनेक प्रकार बाजारपेठेत उपलब्ध असल्याची माहिती दुकानदार यांनी दिली.
advertisement
6/6
सणासुदीला काळा रंग खरंतर वर्ज्य आहे. मात्र मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय मकर संक्रांतीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
संक्रांतीला खरेदी करा फक्त 400 रुपयांत साडी; पुण्यातील 'या' बाजारपेठेत अनेक प्रकार उपलब्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल