गावाची गोष्ट लय भारी! संपूर्ण गावात फक्त एकच फॅमिली, भारतातील अजब गावाची गजब कहाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
India Unique Village Only One Family Lives : कधी अशा गावाबाबत ऐकलं आहे जिथं फक्त एकच कुटुंब राहतं. तरी या गावासाठी सरकारी योजना आहेत आणि त्याचा लाभ त्यांना मिळतो.
advertisement
1/7

गाव म्हटलं की तिथं काही कुटुंबाची घरं असतात. पण संपूर्ण गावात फक्त एकच कुटुंब राहत असल्याचं सांगितलं तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण भारतात असं एक गाव आहे, जिथं फक्त एकच कुटुंब राहतं. संपूर्ण गाव एकाच कुटुंबाच आहे.
advertisement
2/7
पहिल्या दृष्टीक्षेपात तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जंगलात आला आहात आणि इथं कोणीही राहत नाही. पण ते खूप लहान आहे फक्त 87 हेक्टर. पण इथं एक मोठं घर आहे जिथं तुम्हाला फक्त एकच कुटुंब हसताना आणि खेळताना दिसेल.
advertisement
3/7
एका कुटुंबात 40 लोक आहेत. सर्व नातेवाईक आहेत. बाकीचे काळानुसार स्थलांतरित झाले. कारण इथं भौतिक सुखसोयींचा मोठा अभाव आहे.
advertisement
4/7
या कुटुंबातील एक सदस्य सुदेश सांगतो की बऱ्याचदा लोक आम्हाला विचारतात की आम्हाला भीती वाटत नाही का? त्याने सांगितलं की, शेजारीच आणखी एक गाव आहे आणि ते गाव खूप गर्दीचं आहे. अशा परिस्थितीत, जर आम्ही पुढे फोन केला तर सर्व लोक येतील. म्हणून भीती नावाची कोणतीही गोष्ट नाही. इथे प्राणी आणि मानव सर्व आपलेच आहेत.
advertisement
5/7
अधिकारी म्हणतात की इथं राहणारं हे कुटुंबं स्थलांतरित झालं नाही कारण ते म्हणतात की आम्ही इथं शांततेत राहतो. आम्हाला जास्त भौतिक सुखसोयींची गरज नाही. जंगलातून जे काही येतं ते पुरेसे आहे. आम्ही गायी, म्हशी, शेळ्या चरतो आणि आनंदी आहोत. आमच्याकडे दूध देण्यासाठी एक गाय आहे. ती किंवा बकरी विकून आणि थोडी शेती करून आमचं जीवन चांगले चालतं.
advertisement
6/7
या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेसारख्या अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या मुलांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत शिक्षण आणि रेशनपाणीही मिळतं.
advertisement
7/7
आता हे गाव कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. झारखंडमधील हे गाव. रांचीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या खुंटी जिल्ह्यातील रानिया ब्लॉकमध्ये आहे. या गावाचं नाव चेंगरे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
गावाची गोष्ट लय भारी! संपूर्ण गावात फक्त एकच फॅमिली, भारतातील अजब गावाची गजब कहाणी