TRENDING:

Tiger Day 2025: वाघ जगला तर जंगल टिकेल..., आज जागतिक व्याघ्र दिन, मेळघाटात वाघांची संख्या किती?

Last Updated:
Tiger Day 2025: 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि त्यांची संख्या याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7
वाघ जगला तर जंगल टिकेल..., आज जागतिक व्याघ्र दिन, मेळघाटात वाघांची संख्या किती?
प्रत्येक सजिवांचे अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून असतं. त्यामुळे वाघ टिकला तर जंगल टिकेल, जंगल टिकले तर नदी टिकेल, नदी टिकली तर पाणी, पाणी असेल तर अन्न आणि त्याचबरोबर प्राणवायू या सर्व गोष्टी देखील टिकतील. या सर्वच गोष्टी मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
advertisement
2/7
आज 29 जुलै म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन. मानवाच्या अस्तित्वासाठी वाघ टिकणे अत्यंत महत्वाचे आहे. व्याघ्र संवर्धन करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्ताने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाबत अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे सांगतात की, रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे 2010 मध्ये जागतिक व्याघ्र परिषद भरली होती. त्यात 29 जुलै हा व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर भारतातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. भारताने त्या दिशेने प्रयत्न सुद्धा सुरू केलेत, असे त्यांनी सांगितले.
advertisement
4/7
भारतात एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यातील 6 प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत. भारतातील एकूण 58 व्याघ्र प्रकल्पात 2965 पेक्षा जास्त वाघांची संख्या आहे. महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पात 400 पेक्षा जास्त वाघांची संख्या आहे. सर्वाधिक वाघांची संख्या ही ताडोबा अभयारण्यात आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 55 ते 60 वाघांची संख्या असल्याचा अंदाज या व्याघ्र गणनेनुसर आहे, असेही तटरे यांनी सांगितले.
advertisement
5/7
मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिल्या 10 प्रकल्पांपैकी एक आहे. 1973 मध्ये भारत सरकारने व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना राबविली. 22 फेब्रुवारी 1974 मध्ये भारतातील पहिल्या 10 व्याघ्र प्रकल्पामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला.
advertisement
6/7
मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एकूण 4 हजार चौरस फूट क्षेत्रात पसरला आहे. त्याची चार भागात विभागानं केली आहे. अकोट वन्यजीव विभाग, गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट बफर वन्यजीव विभाग असे चार विभाग आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 300 गावांचा समावेश असून त्यातील 22 ते 23 गावाचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. वनविभागाच्या प्रयत्नाने आणि आदिवासी बांधवांच्या सहकार्याने वाघांना मोकळा श्वास मिळत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, व्याघ्र संवर्धनात अनेक समस्या येतात. मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष, अवैध शिकार अशा घटनांकडे वनविभागाने लक्ष देवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण वाघ टिकेल तर जंगल टिकेल, जंगल टिकेल तर निसर्ग टेकले. त्यावरच मनुष्य जीवन अवलंबून आहे. त्यामुळे व्याघ्र संवर्धन महत्वाचे आहे, असे वन्य जीव अभ्यासक यादव तरटे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अमरावती/
Tiger Day 2025: वाघ जगला तर जंगल टिकेल..., आज जागतिक व्याघ्र दिन, मेळघाटात वाघांची संख्या किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल