पिकलेले केस अन् थकलेलं शरीर, छगन भुजबळ यांचे हॉस्पिटलमधील PHOTOS समोर, नाशकातील वादानंतर कोकाटे पोहोचले भेटीला!
- Published by:Sachin S
Last Updated:
मंत्री छगन भुजबळांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी मंत्री झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
advertisement
1/7

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ह्रदय शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर भुजबळ यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ आले होते.
advertisement
2/7
मंत्री छगन भुजबळांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी मंत्री झिरवळ आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
advertisement
3/7
छगन भुजबळ यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई इथं हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज त्यांची भेट घेतली.
advertisement
4/7
हृदय शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांची प्रकृती आता स्थिर आहे, पण कमाली तब्येत खालावली आहे.
advertisement
5/7
विशेष म्हणजे, मध्यंतरी माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यात नाशिकमध्ये वाद विकोपाला गेला होता. जिल्ह्यात वर्चस्व आणि सहकारी बँकांच्या मुद्यावर वाद पेटला होता.
advertisement
6/7
त्यावेळी भुजबळांनी कोकाटे यांच्यावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कोकाटे आणि भुजबळ यांच्यात संघर्ष पेटला होता.
advertisement
7/7
पण, आता हा वाद विसरून दोन्ही नेते एकत्र आले. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होतील, अशी माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पिकलेले केस अन् थकलेलं शरीर, छगन भुजबळ यांचे हॉस्पिटलमधील PHOTOS समोर, नाशकातील वादानंतर कोकाटे पोहोचले भेटीला!