चूक झाली, क्षमा मागतो; जिचा विषय संपला म्हणाले तिच्याशीच हर्षवर्धन जाधवांनी केलं लग्न
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
हर्षवर्धन जाधव यांनी इशा झा सोबत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर नवरात्रीनिमित्त नारीशक्तीचे महत्त्व सांगणारा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केलाय.
advertisement
1/7

कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव हे पुन्हा बोहल्यावर चढले. ईशा झा यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
advertisement
2/7
दोन महिन्यांपूर्वीच जाधव यांनी ईशा झा यांचा विषय आपल्यासाठी संपला असल्याचं म्हटलं होतं. इशासोबत आपलं जुळत नााही असंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता त्यांनी आपली चूक झाली होती असंही कबूल केलंय.
advertisement
3/7
इशा माझी धर्मपत्नी आहे. माझ्याकडून झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा हा मुहूर्त आहे. मी तिची जाहीर क्षमा मागतो, यापुढे चुकणार नाही असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं.
advertisement
4/7
हर्षवर्धन जाधव यांनी इशा झा सोबत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर नवरात्रीनिमित्त नारीशक्तीचे महत्त्व सांगणारा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केलाय.
advertisement
5/7
हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडचे माजी आमदार आहेत. माजी आमदार आणि वडील रायभान जाधव यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
advertisement
6/7
1999 साली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. पुढे 2004 साली त्यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभा राहिले पण पराभव झाला. 2009 ची विधानसभा त्यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली आणि ते निवडूनही आले.
advertisement
7/7
जाधव यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. ते आमदार म्हणून निवडून आले. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चूक झाली, क्षमा मागतो; जिचा विषय संपला म्हणाले तिच्याशीच हर्षवर्धन जाधवांनी केलं लग्न