Weather Alert: 24 तास महत्त्वाचे, मराठवाड्यावर पुन्हा काळे ढग, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी मोठं नुकसान झालंय. आता बुधवारी पुन्हा 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बहुतांश भागांमध्ये पाऊस सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आहे. आज 15 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
2/5
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आज पुन्हा पावसाचं धुमशान असणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये बुधवारी पावसाचा जोर राहील. याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
या पावसामुळे शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धता होईल, परंतु सततचा ओलावा आणि पाणी साचण्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकांना नुकसान पोहोण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही या पावसाचा परिणाम होऊ शकतो. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावू शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय हवामान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांनी सुरक्षित राहावे. जर विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांची गती वाढली, तर घरातच राहणे आणि उघड्या जागी जाणे टाळणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: 24 तास महत्त्वाचे, मराठवाड्यावर पुन्हा काळे ढग, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट