TRENDING:

वारं फिरलं! मराठवाड्यात धो धो कोसळणार की आज उघडीप? पाहा गुरुवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. छ. संभाजीनगर ते बीड पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
वारं फिरलं! मराठवाड्यात धो धो कोसळणार की आज उघडीप? पाहा गुरुवारचा हवामान अंदाज
राज्यात गेल्या 4 दिवसांत पावसाने कहर केला. काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर राहिला. आता मात्र पुन्हा हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज गुरुवारी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या पाऊस आणि हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिलेला नाही.
advertisement
3/5
पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. 24 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा कोणताही इशारा हवामान विभागाने दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाच्या 18 दरवाजांतून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता मात्र पावसाचा जोर ओसरल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
वारं फिरलं! मराठवाड्यात धो धो कोसळणार की आज उघडीप? पाहा गुरुवारचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल