TRENDING:

Marathwada Weather: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल, वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!

Last Updated:
मराठवाड्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल दिसून येणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7
मराठवाड्यातील हवामानात बदल, वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!
मराठवाड्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल दिसून येणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/7
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागात आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ जाणवणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
3/7
बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात दुपारनंतर विजांसह पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागात वाऱ्याचा वेग देखील वाढणार असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
4/7
काही भागांत विजांच्या गडगडाटासह वाऱ्याचा झोंबाही जाणवू शकतो. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात उष्णतेचा जोर मात्र कायम राहणार आहे. या भागात तापमान 33 ते 24 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.
advertisement
5/7
मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यातून थोडा दिलासा मिळू शकतो.
advertisement
6/7
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. दुपारनंतर वातावरणात थोडा बदल होऊन पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि हवामान बदलावर लक्ष ठेवावे.
advertisement
7/7
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने विजांच्या गडगडाटाचा आणि वाऱ्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल, वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल