Marathwada Weather: मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: हवामानाची स्थिती लक्षात घेता 30 जून रोजी मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
1/5

हवामानाची स्थिती लक्षात घेता 30 जून रोजी मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.
advertisement
2/5
सध्या राज्यात सक्रिय झालेला नैऋत्य मोसमी वारा मराठवाड्यात दमदारपणे कार्यरत असून, गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार 30 जून रोजी दिवसभरात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
3/5
शेतकरी वर्गाने देखील सतर्क राहण्याची गरज आहे. पीकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतात उभ्या असलेल्या पिकांवर पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. तसेच विजांच्या कडकडाटामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
advertisement
4/5
हवामान विभागाच्या सूचनांनुसार, अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. हवामान संकेतस्थळांनुसार मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पावसाबरोबर वाऱ्याचा वेगही 30-40 किमी प्रतितास इतका असू शकतो.
advertisement
5/5
त्यामुळे झाडे, विजेच्या तारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानाच्या या बदलत्या स्वरूपामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी हवामान खात्याने आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट