Marathwada Weather : पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात जोरदार कोसळणार पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
मागील दोन दिवस मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले. परंतु 2 नोव्हेंबरला पुन्हा एकदा हलक्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
advertisement
3/5
5 नोव्हेंबरपर्यंत मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. त्यानंतर मात्र राज्यात थंडीचे आगमन होणार आहे.
advertisement
4/5
यामुळे थंडीची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. तर रबी पेरण्यांना देखील वेग येणार आहे.
advertisement
5/5
दोन दिवसांच्या दमट हवामान आणि वाढलेल्या तापमानात पावसामुळे काहीशी घट पहायला मिळत आहे. थंडीची चाहूल लागताच किमान तापमानात लक्षणीय घट होऊ शकतेpra
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात जोरदार कोसळणार पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट