TRENDING:

Marathwada Weather : ऐन दिवाळीत हवापालट, मराठवाड्यात विचित्र हवामान, नवा अलर्ट काय?

Last Updated:
सध्या मराठवाड्यात कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. हवामान विभागाकडून आज बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/5
ऐन दिवाळीत हवापालट, मराठवाड्यात विचित्र हवामान, नवा अलर्ट काय?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ-उतार दिसून येत असले तरी सध्या मराठवाड्यात कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. हवामान विभागाकडून आज बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून दिवसभर वातावरणात गारवा जाणवू शकतो.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये आज संपूर्णतः कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागांमध्ये ऑक्टोबर हिटचा प्रभाव कायम असून, दुपारच्या सुमारास तापमानात वाढ जाणवेल. दिवसाचे कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ऑक्टोबर महिन्यातील ही उष्णता शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात चिंताजनक ठरत आहे. कारण सोयाबीन आणि तूर पिकांच्या काढणीच्या हंगामात जास्त उष्णतेमुळे पिकांची झड आणि दाण्यांवरील परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, बीड आणि लातूरसारख्या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून होणाऱ्या हलक्या सरी पिकांना थोडाफार दिलासा देणाऱ्या ठरतील.
advertisement
4/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगांचा दाब होत नाही, त्यामुळे पावसाचा प्रभाव फक्त मर्यादित ठिकाणीच राहणार आहे. तथापि, पुढील दोन दिवस तापमानातील चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
हवामान विभागाने नागरिकांना दिवसा उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी काढणीच्या प्रक्रियेदरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात गारवा जाणवेल, अशीही शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : ऐन दिवाळीत हवापालट, मराठवाड्यात विचित्र हवामान, नवा अलर्ट काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल