Marathwada Weather : मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, तापमानात वाढ कायम, आज काय राहील स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. आज 13 ऑक्टोबर या दिवशी मराठवाड्यात पावसाची शक्यता नसून हवामान पूर्णपणे कोरडेच राहणार आहे.
advertisement
1/5

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. आज 13 ऑक्टोबर या दिवशी मराठवाड्यात पावसाची शक्यता नसून हवामान पूर्णपणे कोरडेच राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये कोणताही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दिवसभर प्रखर ऊन आणि उकाड्याचे वातावरण राहणार असून ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव अधिक तीव्र जाणवणार आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर बीडमध्ये 34.5 अंश, लातूरमध्ये 35.2 अंश, परभणीमध्ये 34.8 अंश, नांदेडमध्ये 34 अंश, हिंगोलीमध्ये 33.6 अंश, धाराशिवमध्ये 33 अंश आणि जालन्यात 32.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात सरासरी 1 ते 2 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
advertisement
3/5
दिवसभर उकाडा जाणवणार असून सकाळी हलकासा गारवा आणि रात्री तुलनेने थंडावा राहील. मात्र दुपारच्या वेळेत सूर्यकिरणांचा चटका वाढणार असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या उत्तर भारतातून येणारे कोरडे वारे आणि ढगांचा अभाव यामुळे मराठवाड्यात पावसाचे कोणतेही संकेत नाहीत.
advertisement
4/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार ही हवामानस्थिती शेतकऱ्यांसाठी एकीकडे दिलासा देणारी असली तरी उष्णतेचा परिणाम पिकांवर होऊ शकतो. विशेषतः कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांसाठी सिंचनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरते.
advertisement
5/5
एकूणच आज 13 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहणार आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे तापमानात वाढ होत असून ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, तापमानात वाढ कायम, आज काय राहील स्थिती?