TRENDING:

Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, पुढील 24 तासांचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने उघडीप दिली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, पुढील 24 तासांचा हवामान अंदाज
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. परंतु, आता मात्र पाऊस ओढ लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिलेला नाही.
advertisement
2/5
मराठवाड्यात मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. परंतु, सर्वदूर पाऊस न झाल्याने काही भागात पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे देखील पेरण्या रखडल्या आहेत.
advertisement
3/5
कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
4/5
लातूर धाराशिव नांदेड एकदोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु मागील चार-पाच दिवसांच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाची तीव्रता अत्यंत कमी होणार आहे. यामुळे खरिपाच्या पेरणीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. पेरणी केली असेल अन् सिंचनाची सोय असेल तर गरजेनुसार पिकांना पाण्याचे नियोजन करावे, असंही आवाहन करण्यात आलं आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, पुढील 24 तासांचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल