Marathwada Rain: शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, मराठवाड्यात पाऊस पडणार का? आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/6

राज्यातील काही भागात मान्सूनचा जोर असला तरी मराठवाड्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी आभाळाकडे डोळा लावून बसला आहे. आज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून पुढील 24 तासांत मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/6

3/6
27 जून रोजी मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या सक्रियतेमुळे आकाश ढगाळ राहणार असून दुपारनंतर अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/6
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, आज कोणताही दक्षतेचा अलर्ट देण्यात आलेला नाही. बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
advertisement
6/6
दरम्यान, मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे 28 जूनपासून काही दिवस हवामानात बदल जाणवण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य ते व्यवस्थापन करावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, मराठवाड्यात पाऊस पडणार का? आजचा हवामान अंदाज