TRENDING:

'अजून विश्वास बसत नाही', पहाटे सुप्रिया सुळेंनी ठेवले 3 स्टेटस, दादांच्या आठवणीत व्याकूळ

Last Updated:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी निधन झालं. एका विमान अपघातात त्यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवारांवर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
advertisement
1/7
'अजून विश्वास बसत नाही', पहाटे सुप्रिया सुळेंनी ठेवले 3 स्टेटस, दादांच्या आठवणीत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी निधन झालं. एका विमान अपघातात त्यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवारांवर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
advertisement
2/7
अजित अंत्यविधीसाठी राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक बारामतीत पोहोचले आहेत. संपूर्ण शहरात शोकाकुल वातावरण आहे. सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
advertisement
3/7
दरम्यान, अजित पवारांच्या भगिनी आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहाटेच्या सुमारास तीन व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले आहेत.
advertisement
4/7
यातील पहिल्या स्टेटसमध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची ३५ वर्षे जुनी आठवण शेअर केली आहे.
advertisement
5/7
सुप्रिया सुळेंनी डिजिटल स्क्रीनवर अजित पवार यांचा फोटो आणि त्यांच्याशी संबंधित माहिती झळकत असलेला हा फोटो स्टेटसला ठेवला असून, त्यावर फक्त एकच शब्द लिहिला आहे “Heartbreaking". यामुळे त्यांच्या मनात असलेळ्या भावाबद्दलचे प्रेम दिसून येत आहे. १९९१ साली अजित पवार पहिल्यांदा खासदार झाले होते. हीच माहिती या फोटोत दिसत आहे.
advertisement
6/7
दुसऱ्या स्टेटसमध्ये हाच फोटो सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या अँगलमध्ये शेअर केला आहे. अजूनही यावर विश्वास बसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
7/7
तर सकाळी पहाटे सात वाजता त्यांनी तिसरं स्टेटस ठेवलं असून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही वेळ आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
'अजून विश्वास बसत नाही', पहाटे सुप्रिया सुळेंनी ठेवले 3 स्टेटस, दादांच्या आठवणीत व्याकूळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल