ही साडी नको, ती दाखवा... पंकजा कन्फ्यूज, बहिणीसाठी धनंजय मुंडेंची साडी खरेदी; ताईचा चेहरा खुलला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दुकानात प्रत्येक साडीची चौकशी करत धनुभाऊंनी स्वतः पंकजा मुंडे यांच्यासाठी खरेदी केली, तर पंकजा मुंडे यांनीही काही साड्यांची निवड केली.
advertisement
1/7

राज्यातील राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेणारा प्रसंग परळीत पाहायला मिळाला. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे साडी शॉपिंग मॉलच्या शुभारंभ सोहळ्यात एकत्र दिसून आले.
advertisement
2/7
साडी शॉपच्या उद्घाटन सोहळ्यानंतर एक भावनिक आणि चर्चेचा क्षण उपस्थितांच्या नजरेत भरला. उद्घाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आवर्जून पंकजा मुंडे यांना दुकानात घेऊन जात साड्या खरेदीसाठी गेले
advertisement
3/7
विशेष म्हणजे, दुकानात प्रत्येक साडीची चौकशी करत धनुभाऊंनी स्वतः पंकजा मुंडे यांच्यासाठी खरेदी केली, तर पंकजा मुंडे यांनीही काही साड्यांची निवड केली.
advertisement
4/7
अनेक दिवसांपासून राजकीय मतभेद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत असलेले मुंडे बंधू-भगिनी आज एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसल्याने उपस्थितांमध्येही कुतूहल निर्माण झाले.
advertisement
5/7
या दृश्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नागरिक, व्यापारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
advertisement
6/7
दरम्यान, या कार्यक्रमात राजकारणावर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही.
advertisement
7/7
मात्र, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा एकत्रित सहभाग आणि दुकानातील हा प्रसंग आगामी राजकीय चर्चांना नवे परिमाण देणारा ठरत आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ही साडी नको, ती दाखवा... पंकजा कन्फ्यूज, बहिणीसाठी धनंजय मुंडेंची साडी खरेदी; ताईचा चेहरा खुलला