अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचेही पैसे डुबवले, शशांक केतकरनंतर कोकण हार्टेड गर्लही भडकली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
इंडस्ट्रीत फसवणुकीचे प्रकार चर्चेत आहेत. शशांक केतकरने मंदार देवस्थळीविरोधात पोलिसांत तक्रार केली. अंकिता वालावालकरनेही नवरा कुणाल भगतचे पैसे थकीत असल्याचं सांगितलं.
advertisement
1/8

अभिनेता शशांक केतकर आणि निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यातील वाद चांगलाच वाढला. चार वर्ष पाठपुरावा करूनही मंदार यांनी शशांकला त्याच्या मालिकेचे पैसे दिले नाहीत. 'हे मन बावरे' या मालिकेचे थकलेले पैसे अद्याप न दिल्यानं शशांकने पोलिसांत धाव घेतली आहे.
advertisement
2/8
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी पुढे आली. त्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
3/8
इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शशांक केतकरला सपोर्ट दिला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर झालेला संपूर्ण प्रकारही सांगितला आहे. शशांकच्या व्हिडीओखाली असलेलं कमेंट सेक्शन भरून गेलं आहे.
advertisement
4/8
अशातच सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक अंकिता वालावालकर हिनं केलेली कमेंट देखील चर्चेत आली आहे. अंकिताच्या नवऱ्याची देखील अशीच फसवणूक झाल्याचं तिनं सांगितलं आहे.
advertisement
5/8
शशांकच्या व्हिडीओवर अंकितानं कमेंट करत तिचा नवरा कुणाल भगत याला टॅग केलं आहे. तिनं लिहिलंय, "कुणाल तुझे ज्यांनी डुबवलेत त्यांची नावं लिहू का रे मी इथे?"
advertisement
6/8
अंकिताची ही कमेंट चर्चेत आली आहे. तिच्या या कमेंटवर अनेकांनी तिला बिनधास्त नावं लिही असं सांगितलं आहे. या कमेंटवरून हे लक्षात येतं अंकिताचा नवरा कुणाल भगत याचेही पैसे थकीत आहेत.
advertisement
7/8
अंकिताचा नवरा कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. त्यानं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांसाठी काम केलं आहे. शशांकसारखीच त्याचीही परिस्थिती असल्याचं अंकिताच्या कमेंटवरून लक्षात येत आहे.
advertisement
8/8
कुणाल भगत अनेक ठिकाणी म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करतोय, त्याने अनेक म्युझिक अल्बमसाठीही काम केलं आहे. पण अनेकांनी त्याला देखील पैसे दिले नाहीत तसंच त्याचेही पैसे डुबवलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचेही पैसे डुबवले, शशांक केतकरनंतर कोकण हार्टेड गर्लही भडकली