Vicky - Katrina Baby Name : विक्की-कतरिनाच्या लेकाचं नामकरण! अतरंगी नावांच्या ट्रेंडमध्ये ठरलं वेगळं, सगळ्यांनाच आवडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vicky Kaushal - Katrina Kaif Baby Name : अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या मुलाचं नुकतंच बारसं केलं आहे. ट्रेडिंग नावांच्या गोंधळणात त्यांच्या बाळाचं नाव सगळ्यांपेक्षा वेगळं ठरलं आहे.
advertisement
1/8

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांआधीच आई बाबा झालेत. त्यांच्या घरी त्यांच्या पहिल्या बाळाचं आगमन झालं. कतरिनाने गोंडस मुलाला जन्म झाला. कौशल कुटुंबाच्या घरी ज्युनिअर विक्कीचं मोठ्या स्वागत केलं. मुलाच्या जन्मानंतर विक्की आणि कतरिना त्याची काळजी घेण्यात बिझी आहेत.
advertisement
2/8
विक्की आणि कतरिनाला मुलगा तर झाला पण आता त्याचं नाव काय ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. सध्या बाळांची नाव ठेवण्याचा एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतोय. एक एक नावं ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावतात आणि हसू येतं.
advertisement
3/8
सेलिब्रेटींच्या बाळांची नावं देखील नेहमीच चर्चेचा विषय असतात. आता विक्की आणि कतरिना त्यांच्या बाळाचं काय नाव ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर विक्की आणि कतरिनानं त्यांच्या बाळाचं बारसं केलं आहे.
advertisement
4/8
विक्की कौशल आणि कतरिना यांनी सोशल मीडियावर एक क्यूट फोटो शेअर करत त्यांच्या मुलाचं नाव सर्वांना सांगितलं. सध्याच्या ट्रेडिंग नावांपेक्षा विक्की - कतरिनाच्या मुलाचं खूप वेगळं ठरलं आहे.
advertisement
5/8
कतरिना आणि विक्की कौशल यांच्या मुलाचं नाव हे 'विहान कौशल' असं आहे. दोघांचा विहानचा चिमुकला हात हातात घेतलेल्याचा फोटो शेअर केला आहे.
advertisement
6/8
कतरिनानं पोस्टमध्ये लिहिलंय, "आमचा प्रकाशकिरण. विहान कौशल. प्रार्थनांना उत्तर मिळालं आहे. आयुष्य सुंदर आहे. एका क्षणात आमचं संपूर्ण विश्व बदलून गेलं. शब्दांच्या पलीकडची कृतज्ञता."
advertisement
7/8
विक्की आणि कतरिना यांना 7 नोव्हेंबर 2025 रोजी मुलगा झाला. कतरिनाच्या प्रेग्नंसीची बातमी अनेक महिने त्यांनी सीक्रेट ठेवली होती. अखेर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यात त्यांनी ती बातमी चाहत्यांना दिली.
advertisement
8/8
विक्की - कतरिनाच्या बाळाचं नाव तर त्यांनी सांगितलं आता विहान कौशल दिसतो कसा याकडे सर्वांचं आहे. विक्की - कतरिना बाळाचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार, विरहानला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vicky - Katrina Baby Name : विक्की-कतरिनाच्या लेकाचं नामकरण! अतरंगी नावांच्या ट्रेंडमध्ये ठरलं वेगळं, सगळ्यांनाच आवडलं