TRENDING:

Bigg Boss Marathi 6 चा बिग धमाका! सीझन 6 मध्ये 'पुष्पा'ची एन्ट्री, मराठी इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा सुपरस्टार जाणार घरात?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : मराठीसह बॉलिवूड आणि आता साऊथही गाजवणारा मराठीतील सर्वात मोठा सुपरस्टार बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री करणार आहे. कोण आहे तो?
advertisement
1/8
Bigg Boss Marathi 6 चा बिग धमाका! सीझन 6 मध्ये 'पुष्पा'ची एन्ट्री?
मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वात मोठा शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शोचा 6 वा सीझन म्हणजेच बिग बॉस मराठी 6 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी 6 सुरू होणार आहे.
advertisement
2/8
बिग बॉस सुरू होण्याआधी अनेक स्पर्धकांची नावं चर्चेत आली आहेत. अनेक स्पर्धक या शोमध्ये जातील अशी माहिती समोर आली आहे. अशातच इंडस्ट्रीतील एक मोठं नाव बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
3/8
आपल्या अभिनयाने केवळ मराठीच नाही हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा आपला मराठी पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंकविलाने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे.
advertisement
4/8
अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 मध्ये मोठा ट्विस्ट आणणार आहे. तो स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
5/8
श्रेयस तळपदे बिग बॉसचा गेम खेळण्यास योग्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्याचा शांत आणि समजूतदार स्वभाव घरात वेगळीच रंगत आणेल. घरात होणारे कट, ग्रुपिझम हे सगळं तो योग्यरित्या हँडल करू शकतो.
advertisement
6/8
श्रेयस तळपदे गेली अनेक वर्ष कॉमेडी, ड्रामा तसंच अनेक गंभीर भूमिका करताना दिसत आहे. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमात त्याने काम केलं आहे. श्रेयसला बिग बॉस मराठीच्या घरात पाहणं प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरेल.
advertisement
7/8
अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6 चा होस्ट आहे. रितेश आणि श्रेयस दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. एक मित्र शोचा होस्ट तर दुसरा स्पर्धक म्हणून पाहणं मजेशीर ठरणार आहे.
advertisement
8/8
दरम्यान श्रेयस तळपदे किंवा त्याच्या टीमकडून तो बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 चा बिग धमाका! सीझन 6 मध्ये 'पुष्पा'ची एन्ट्री, मराठी इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा सुपरस्टार जाणार घरात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल