उजव्या की डाव्या हातात, कोणत्या बोटात घालावी सोन्याची अंगठी?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक धातू न मानता 'वैभव' आणि 'समृद्धी'चे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा थेट संबंध सूर्य आणि गुरु ग्रहांशी असतो. त्यामुळे सोन्याची अंगठी चुकीच्या बोटात घातल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
advertisement
1/7

भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक धातू न मानता 'वैभव' आणि 'समृद्धी'चे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा थेट संबंध सूर्य आणि गुरु ग्रहांशी असतो. त्यामुळे सोन्याची अंगठी चुकीच्या बोटात घातल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला जीवनात यश, आरोग्य आणि धनलाभ हवा असेल, तर सोन्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी, याचे काही नियम पाळणे आवश्यक आहे.
advertisement
2/7
तर्जनी - प्रगतीसाठी उत्तम: अंगठ्याच्या बाजूचे पहिले बोट म्हणजेच 'तर्जनी'. हे बोट गुरु ग्रहाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला करिअरमध्ये यश, शिक्षण, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घालणे अत्यंत लाभदायक ठरते.
advertisement
3/7
मधल्या बोटात सोने टाळावे: हाताचे मधले बोट शनी ग्रहाचे मानले जाते. सोने हा सूर्याचा धातू असल्याने शनी आणि सूर्यामध्ये शत्रुत्व आहे. त्यामुळे मधल्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने जीवनात संघर्ष, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. या बोटात लोखंडाची किंवा स्टीलची अंगठी घालणे अधिक श्रेयस्कर असते.
advertisement
4/7
अनामिका - सुख-समृद्धीचे प्रतीक: करंगळीच्या शेजारचे बोट म्हणजेच 'अनामिका'. या बोटाचा संबंध सूर्य आणि शुक्र ग्रहाशी आहे. या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने मान-सन्मान वाढतो आणि कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभते. विवाहित महिलांनी या बोटात अंगठी घालणे सौभाग्यदायी मानले जाते.
advertisement
5/7
उजवा की डावा हात? ज्योतिषशास्त्रानुसार, पुरुषांनी सोन्याची अंगठी नेहमी उजव्या हातात घालणे शुभ मानले जाते. महिलांच्या बाबतीत, त्या आपल्या इच्छेनुसार दोन्हीपैकी कोणत्याही हातात अंगठी घालू शकतात, परंतु उजव्या हातात अंगठी घालणे अधिक प्रभावशाली मानले जाते.
advertisement
6/7
अंगठ्यात सोने नको: अंगठा हा शुक्र आणि मंगळाचे स्थान मानला जातो, परंतु काही शास्त्रांनुसार अंगठ्यात सोन्याची अंगठी घालणे टाळावे. यामुळे व्यक्तीमध्ये अहंकार आणि राग वाढण्याची शक्यता असते. अंगठ्यासाठी चांदी हा धातू सर्वात उत्तम मानला जातो.
advertisement
7/7
गुरुवारी धारण करणे लाभदायक: सोन्याचा स्वामी गुरु असल्याने, सोन्याची अंगठी परिधान करण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. अंगठी घालण्यापूर्वी ती कच्च्या दुधाने आणि गंगाजलाने शुद्ध करून 'ॐ बृं बृहस्पतये नमः' या मंत्राचा जप केल्यास तिचे शुभ फळ त्वरित मिळते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)