बापरे! केस स्ट्रेट केल्याने किडनी फेल होण्याचा धोका; डॉक्टरांनी सांगितलं कनेक्शन, कसा होतो परिणाम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hair Straightening Cause Kidney Fail : केस स्ट्रेट केल्याने किडनी फेल, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हेअर स्ट्रेनिंग आणि किडनीचा कसा काय संबंध आहे हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
1/5

काहींचे केस नैसर्गिकरित्या स्ट्रेट असतात आणि ज्यांचे नाही त्यांना आता केस स्ट्रेट करण्याचे बरेच पर्याय आहेत. मशीन किंवा क्रिमने केस स्ट्रेट करता येतात. तात्पुरते आणि कायमचेही स्ट्रेट करता येतात. पण केस स्ट्रेट करण्याची पद्धत किडनीसाठी घातक ठरू शकते.
advertisement
2/5
केस स्ट्रेट केल्यामुळे किडनी फेल होऊ शकते. हे वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल. हे कसं काय शक्य आहे. केस स्ट्रेट करण्याचा आणि किडनीचा काय संबंध आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
3/5
एका डॉक्टरांनी केस स्ट्रेट केल्यामुळे किडनी फेल होऊ शकते असं सांगितलं आहे. त्यांनी एका प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार इज्राइलमध्ये 15 वर्षांच्या मुलीने केस स्ट्रेट केले, नंतर नंतर तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या. रुग्णालयात तपासणी केलं असतं तिला एक्युट किडनी इंज्युरी झाल्याचे निदान झालं. तिला एआरएफ म्हणजे एक्युट रिनल फेल्युर झालं.
advertisement
4/5
याचं कारण होतं ते तिने केस स्ट्रेट करण्यासाठी वापरलेलं उत्पादन. ज्यात ग्लायऑक्झालिक अ‍ॅसिड हे एक केमिकल आहे जे आपले केस स्ट्रेट करतं पण सोबत किडनीही खराब करू शकतं. यामुळे नेफ्रोपॅथी होतं आणि नेफ्रोपॅथी झाल्यावर किडनी फेल होतात. यामुळे डायलिसिसची गरज पडते, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
5/5
अनेक देशांमध्ये हे केमिकल बॅन आहे पण भारतात हे केमिकल मिळतं. त्यामुळे केस स्ट्रेट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिममध्ये हे केमिकल आहे की नाही ते तपासूनच घ्या, असा सल्ला डॉ. ब्रजपाल त्यागी यांनी दिला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
बापरे! केस स्ट्रेट केल्याने किडनी फेल होण्याचा धोका; डॉक्टरांनी सांगितलं कनेक्शन, कसा होतो परिणाम