ICC चा बांगलादेशला 'जोर का झटका', धुडकावून लावली मागणी; T20 World Cup साठी फक्त तीन पर्याय शिल्लक, पाहा कोणते?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
ICC refuse Demand of Bangladesh no change in venues : बीसीबी आणि आयसीसी यांच्यात झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत, बांगलादेशला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल, अन्यथा त्यांना महत्त्वाचे पॉईंट्स गमवावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) भारतात होणारे मॅचेस बाहेर हलवण्याची मागणी स्पष्टपणे धुडकावून लावली आहे. त्यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत.
advertisement
2/7
बीसीबी आणि आयसीसी यांच्यात झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत, बांगलादेशला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल, अन्यथा त्यांना महत्त्वाचे पॉईंट्स गमवावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/7
विशेष म्हणजे, 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत बांगलादेशचे 3 सामने कोलकाता आणि 1 सामना मुंबईत नियोजित आहे. जर बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, तर त्यांच्यासमोर आता तीनच पर्याय उरले आहेत.
advertisement
4/7
पहिला म्हणजे, पाकिस्तानचे सामने जसे श्रीलंकेत आयोजित केले आहेत. तसेच बांगलादेशचे सामने देखील श्रीलंकेत हलवले जाऊ शकतात. त्यानंतर बांग्लादेश वर्ल्ड कप खेळू शकतो.
advertisement
5/7
दुसरा पर्याय म्हणजे, बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिल्यास त्यांचे प्रतिस्पर्धी संघ न खेळता विजयी घोषित केले जातील, जसे 1996 आणि 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये घडलं होतं.
advertisement
6/7
तिसरा सर्वात पर्याय म्हणजे, बांगलादेश या स्पर्धेवर पूर्णपणे बहिष्कार टाकू शकतो, अशा स्थितीत आयर्लंडसारख्या अन्य संघाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात बांगलादेशी खेळाडूंवर बंदी आल्याने बीसीसीआयवर देखील टीका होताना दिसत आहे. मात्र, आयसीसीने बीसीसीआयची बाजू भक्कमपणे लावून धरलीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ICC चा बांगलादेशला 'जोर का झटका', धुडकावून लावली मागणी; T20 World Cup साठी फक्त तीन पर्याय शिल्लक, पाहा कोणते?