बचावासाठी झाडावर चढले पण....वणवा विझवताना वनपालाचा होरपळून मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सहकाऱ्यांसोबत आग विझवित असताना ते पुढे निघाले, दरम्यान आग वाढली, त्यावेळी त्यांचे सहकारी बाहेर निघून आले मात्र शिंगणजोडे चारही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले.
advertisement
1/7

यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात मनपूर वर्तुळात रान तुळस वाढलेल्या जंगलात पेटलेला वन वणवा विझवीताना वनपालाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
advertisement
2/7
विजय शिंगनजुडे असे मृत वनपालाचे नाव आहे. जंगलात वणवा पेटल्याचे समजतात ते वरिष्ठांच्या आदेशावरून पथकासमवेत जंगलात पोहोचले.
advertisement
3/7
सहकाऱ्यांसोबत आग विझवित असताना ते पुढे निघाले, दरम्यान आग वाढली, त्यावेळी त्यांचे सहकारी बाहेर निघून आले मात्र शिंगणजोडे चारही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले.
advertisement
4/7
बचावासाठी त्यांनी झाडावर आश्रय घेतला. आगीच्या ज्वाला भडकल्याने ते झाडावरून खाली कोसळले आणि ते ६० टक्के भाजले गेले.
advertisement
5/7
गंभीर जखमी वनपाल शिंगनजुडे यांचे वर सुरुवातीला शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
advertisement
6/7
दरम्यान त्यांचा आज श्वासोच्छवास घेताना त्रास होऊ लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वनपाल वनरक्षकांना वणवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही.
advertisement
7/7
वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटने ने उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बचावासाठी झाडावर चढले पण....वणवा विझवताना वनपालाचा होरपळून मृत्यू