TRENDING:

Latur: 1 कोटीसाठी तरुणाला जिवंत जाळलं, खूनही पचवला पण गर्लफ्रेंडला केलेल्या एका मेसेजमुळे गेम ओव्हर

Last Updated:
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी एका धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे. एका व्यक्तीने लिफ्ट मागणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
1/9
Latur: तरुणाला जिवंत जाळलं, खूनही पचवला पण GFला केलेल्या मेसेजमुळे गेम ओव्हर
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी एका धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे. एका व्यक्तीने लिफ्ट मागणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
2/9
आरोपी गणेश चव्हाण याने एका कोटीच्या विम्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या व्यक्तीची हत्या केली होती. हा मृतदेह स्वत:चा वाटावा म्हणून त्याने आपल्या हातातील कडं मृतदेहाजवळ टाकलं होतं.
advertisement
3/9
संबंधित कड्यावरून हा मृतदेह गणेशचा असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं होतं. त्यामुळे अज्ञातानी गणेशची हत्या करून त्याला कारमध्ये टाकून जाळलं असावं, असं पोलिसांना वाटलं.
advertisement
4/9
१ कोटींचा विमा मिळवण्यासाठी गणेशने केलेला हा प्लॅन यशस्वी झाला होता. पण अवघ्या १२ तासांत त्याचं बिंग फुटलं आहे.
advertisement
5/9
त्याने गर्लफ्रेंडला केलेल्या मेसेजमुळे पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला कोकणातून बेड्या ठोकल्या.
advertisement
6/9
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना उघडकीस आली, तेव्हा लातूर पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटवरून गणेश चव्हाणची ओळख पटवली होती.
advertisement
7/9
यानंतर त्यांनी जेव्हा गणेशचे मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्याकडे दोन फोन असल्याची माहिती मिळाली. पण दोन्ही फोन बंद लागत होते. त्यामुळे पोलिसांकडे काहीच सुगावा नव्हता.
advertisement
8/9
दरम्यान, पोलिसांनी गणेशने मृत्यूआधी कुणाला कॉल केले होते, याचा शोध घेतला. तेव्हा तो एका तरुणीशी बोलत असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी तरुणीला तब्यात घेऊन तिची चौकशी केली असता गणेशचा गेम ओव्हर झाला.
advertisement
9/9
कारण, गणेशने आपले दोन वापरातील फोन बंद केले असले तरी त्याच्याजवळ आणखी एक तिसरा फोन होता. याच फोनवरून तो गर्लफ्रेंडच्या संपर्कात होता. याच आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला कोकणातून बेड्या ठोकल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Latur: 1 कोटीसाठी तरुणाला जिवंत जाळलं, खूनही पचवला पण गर्लफ्रेंडला केलेल्या एका मेसेजमुळे गेम ओव्हर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल