Cyclone News : चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं? तुम्हाला माहितीय का नावामागची स्टोरी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे.
advertisement
1/8

यंदाच्या वर्षात अनेक चक्रीवादळं येऊन गेली ज्याचा फटका वर्षभर हवामानावर पाहायला मिळाला. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आताही थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असून याचं कारणही चक्रीवादळच आहे. पुन्हा एकदा चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/8
<a href="https://news18marathi.com/national/imd-issues-cyclone-miachaung-alert-storm-bay-of-bengal-from-december-3-mhsy-1088498.html">माइचोंग चक्रीवादळ</a> पाच डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलंडण्याचा अंदाज आहे. या काळात माइचोंग चक्रीवादळाचा वेग प्रति तास 80 ते 90 किलोमीटर इतका असू शकतो. तो शंभरवर देखील पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/national/cyclone-michaung-warns-of-heavy-rains-from-imd-in-these-states-mhda-1089060.html">हवामान विभागाने अलर्ट</a> जारी केला आहे.
advertisement
3/8
माइचोंग असं या चक्रीवादळाचं अजब नाव आहे, हे नाव म्यानमारने दिलं होतं. चक्रीवादळ माइचोंग हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातलं सहावं तर बंगालच्या खाडीतलं चौथं वादळ आहे. या चक्रीवादळाची नावं कशी ठेवली जातात त्यांची प्रक्रिया काय असते याबाबत समजून घेऊया.
advertisement
4/8
युनायटेड नेशन्स एजन्सी जागतिक हवामान संघटना (WMO) च्या मते, एका विशिष्ट भौगोलिक स्थानावर किंवा संपूर्ण जगामध्ये एका वेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळ असू शकतात आणि ते एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ ती राहू देखील शकतात.
advertisement
5/8
बचाव कार्य आणि नियोजन करण्यासाठी प्रत्येक वादळाला वेगळं नाव दिलं जातं. गोंधळ टाळण्यासाठी हे प्रयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला वादळांना कोणताही देश नावं देऊ शकत होता, मात्र त्यामुळे गोंधळ होऊ लागला नंतर, हवामानशास्त्रज्ञांनी अधिक संघटित आणि कार्यक्षम प्रणाली अंतर्गत एका यादीतून वादळांची नावे देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6/8
भारतीय हवामान विभाग (IMD) हे चक्रीवादळाचे नाव देण्याचे काम केलेल्या सहा प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्रांपैकी (RSMCs) एक आहे. जेव्हा उत्तर हिंद महासागरावरील वाऱ्याचा वेग 62 किमी प्रतितास या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याचे वर्गीकरण वादळ/चक्रीवादळ/ अशा दोन प्रकारे केलं जातं.
advertisement
7/8
प्रत्येक देश वादळाला नाव देतो. देशांनी दिलेल्या नावांची यादी तयार केली आहे. ते लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतींबाबत तटस्थ असतात. एकदा एखादे नाव वापरले की ते पुन्हा वापरता येत नाही.
advertisement
8/8
आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. याशिवाय हे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावे असही यामध्ये म्हटलं आहे. बांग्लादेश, भारत, इराण, पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, ओमान, कतार, साउदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, UAE, येमेन हे 13 देश चक्रीवादळाची नावं ठरवतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Cyclone News : चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं? तुम्हाला माहितीय का नावामागची स्टोरी