Sangli : अंकली पुलावरून कार कोसळली, पती, पत्नीसह तिघांचा मृत्यू, लग्नसोहळ्याहून परतताना अपघात
- Published by:Suraj
Last Updated:
Sangli Accident News : लग्न सोहळ्याहून परतत असताना गाडी पुलावरून नदीपात्रात कोसळल्यानं सांगलीत भीषण अपघात झालाय. यात पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. (सांगली प्रतिनिधी, असिफ मुर्सल)
advertisement
1/5

सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीन जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
advertisement
2/5
रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात झाला. लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
advertisement
3/5
मृतांमध्ये दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते.
advertisement
4/5
गाडी अंकली पुलावरून सांगलीच्या दिशेने जात असतानाच अचानक गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट नदी पात्रात कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत.
advertisement
5/5
प्रसाद भलचांद्र खेडेकर (40), प्रेरणा प्रसाद खेडेकर (35), वैष्णवी संतोष नार्वेकर (23) यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर (42), वरद संतोष नार्वेकर (21) आणि समरजित प्रसाद खेडेकर या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sangli : अंकली पुलावरून कार कोसळली, पती, पत्नीसह तिघांचा मृत्यू, लग्नसोहळ्याहून परतताना अपघात