Weather Update : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात असते सर्वाधिक उष्णता, आश्चर्यकारक कारण समोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
याभागात इतकी उष्णता का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर चला याबद्दल जाणून घेऊ
advertisement
1/8

जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, येत्या रविवारपर्यंत तापमान 43 अंश सेल्सियसपर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/8
सध्या जिल्ह्यात कमाल तापमान 38.5 अंश आहे. तर आगामी काही दिवसांत तापमानवाढ होणार आहे.
advertisement
3/8
महाराष्ट्र राज्यात साधारण अनेक भागात उन्हाळ्यात तापमान 30-32 अंश जातं तेव्हा आपल्याला नकोसं होतं. पण जळगावमध्ये ते 38.5 अंश पर्यंत जातं. त्यात आता ते 43 अंश सेल्सियसपर्यंत जाणार असल्याचं सांगितलं जातंय, म्हणजे उष्णता त्याचा उच्चांग गाठणार आहे.
advertisement
4/8
आता जळगावमध्ये इतकी उष्णता का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर जळगाव सातपुडा पर्वतरांगांच्या जवळ असलं तरी हे शहर पठारी भागात येतं. त्यामुळे उन्हाळ्यात सूर्यप्रकाश अधिक तीव्र होतो आणि तापमान झपाट्यानं वाढतं.
advertisement
5/8
जळगावाचं हवामान प्रामुख्याने उष्णकटिबंधीय कोरडं (Tropical Dry Climate) आहे. इथं हिवाळ्यात कमी आणि उन्हाळ्यात प्रचंड उष्णता असते. जळगावात सरासरी ७००-८०० मिमी इतकाच पाऊस पडतो, जो कमी मानला जातो. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता (नमी) कमी असते आणि उन्हाच्या तडाख्यानं वातावरण अधिक गरम होतं.
advertisement
6/8
सातपुडा पर्वतरांगांमुळे नर्मदा खोऱ्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम कमी होतो, त्यामुळे जळगावात उन्हाळ्यात उष्ण वारे वाहतात आणि वातावरण गरम राहतो. जे एखाद्या वाळवंटीभागासारखं असतं, त्यामुळे जळगावला महाराष्ट्रातील राजस्थान असं म्हटलं जातं.
advertisement
7/8
आता जळगावातील तापमान 43 अंश सेल्सियसपर्यंत जाणार असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. तसेच आरोग्य समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
advertisement
8/8
जळगाव जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेचा उच्चांक होत असतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान वाढण्याची चिन्हे असल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात असते सर्वाधिक उष्णता, आश्चर्यकारक कारण समोर