Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पुण्यात पारा 10 अंश सेल्सिअस, हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यातील किमान तापमानात चढ उतार सुरु आहेत. अशातच अचानक गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह पुन्हा वाढल्याने किमान तापमानाचा पारा घसरतो आहे.
advertisement
1/7

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह कायम आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ उतार सुरु आहेत. अशातच अचानक गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह पुन्हा वाढल्याने किमान तापमानाचा पारा घसरतो आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. 1 डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील तापमान आणि हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुण्यात आज सोमवार रोजी शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके राहील. पुणे घाटमाथा परिसरात देखील शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात गारठा वाढत आहे. रविवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 29.7 अंशावर राहिला. तर 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 13 ते कमाल 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणातील थंडी वाढून कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहिल. तसेच किमान तापमानाचा पारा 17 अंशापर्यंत राहिल.आज दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण होवून गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
काल रविवारी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 32.1 अंश आणि किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज कमाल तापमानाचा पारा 31 अंशावर राहिल. तसेच किमान तापमानाचा पारा 16 अंशापर्यंत राहिल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 13.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 15 अंशावर राहिल.
advertisement
7/7
डिटवाह चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत असतानाच, अचानकपणे गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे आल्याने किमान तापमानाचा पारा पुन्हा 10 अंशाखाली घसरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पुण्यात पारा 10 अंश सेल्सिअस, हवामान खात्याकडून अलर्ट