TRENDING:

बिबळ्या आला बिबळ्या...! नागपुरात अधिवेशनाच्या धामधूमीत बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार, PHOTO

Last Updated:
नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याने 7 जणांवर हल्ला केला. वनविभाग आणि पोलिसांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडले.
advertisement
1/7
नागपुरात अधिवेशनाच्या धामधूमीत बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार, PHOTO
हिवाळी अधिवेशन सुरू असताना सगळीकडे मात्र चर्चा बिबट्याची सुरू आहे. नागपुरात बिबट्याने अक्षरश: हैदोस घातला आहे. एक दोन नाही तर 7 जणांवर त्याने हल्ला केला आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
2/7
शहरालगतच्या पारडी शिवारात आज पहाटे एका बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला. दोन दिवसांपूर्वी कापसी भागात हा बिबट्या दिसला होता, मात्र त्यावेळी वनविभागाच्या शोधकार्यात तो हाती लागला नव्हता. आज पहाटे याच बिबट्याने दोनहून अधिक नागरिकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
3/7
या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन ते तीन जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे पारडी शिवारात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
advertisement
4/7
बिबट्याला पकडण्याची प्रक्रिया सुरू असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, ज्यामुळे बचाव कार्याला काही प्रमाणात अडथळा येत होता. बिबट्या आक्रमक असल्याने त्याने पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
advertisement
5/7
वनविभाग आणि बचाव पथकाने बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याची तयारी केली. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी सोडलेला पहिला डार्ट हुकला, पण बचाव पथकाने त्वरित दुसरा डार्ट यशस्वीरित्या बिबट्याला मारला. डार्ट लागल्यानंतर बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध होण्याची पथक वाट पाहत होते.
advertisement
6/7
पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर, त्याला जाळीच्या साहाय्याने पकडून पिंजऱ्यात टाकण्यात आले. बिबट्याला पकडण्याचे हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडले.
advertisement
7/7
सुदैवाने, या बचाव मोहिमेदरम्यान बचाव पथकातील कोणालाही दुखापत झाली नाही आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले. बिबट्याला आता पुढील उपचारासाठी आणि सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी घेऊन जाण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बिबळ्या आला बिबळ्या...! नागपुरात अधिवेशनाच्या धामधूमीत बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल