विदर्भात आज बरसणार हलक्या सरी; उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस विदर्भात पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. विविध जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. विदर्भातही 4 दिवस काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा झाला. तर अनेक ठिकाणी वातावरण कोरडे होते. विश्रांतीनंतर आता पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
आज 18 सप्टेंबर पासूनच विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. 19 आणि 20 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल. 20 सप्टेंबरसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/5
विदर्भात 20 सप्टेंबरनंतर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांना पावसाची आस होती. मात्र, पाऊस न आल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.
advertisement
5/5
दरम्यान, कपाशी पिकाला आता मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज असल्याचं कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या 19 आणि 20 सप्टेंबरला होणाऱ्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात आज बरसणार हलक्या सरी; उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता