TRENDING:

Vidarbha Rain Update विदर्भात पावसाचा जोर ओसरला, इथं चेक करा आजचे हवामान

Last Updated:
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झालेत. अशातच दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. राज्यातील इतर भागांसोबत विदर्भातही पावसाचा जोर कमी होणार आहे. 
advertisement
1/5
विदर्भात पावसाचा जोर ओसरला, इथं चेक करा आजचे हवामान
गेले काही दिवस राज्यात तुरळक ठिकाणी चांगला पाऊस झालाय. पण, आता पाऊस परतीच्या वाटेवर आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी होतांना दिसून येत आहे. विदर्भातही पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांत विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे सोयाबिन पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. आता पावसाचा जोर कमी होणार, हे ऐकून शेतकऱ्यांची चिंता थोडी कमी होण्यास मदत होईल.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस झालाय. तर काही ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस हा सोयाबिन पिकासाठी शाप तर कपाशीसाठी वरदान ठरलाय. सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचा जीव सद्या टांगणीला लागलेला आहे. आधीच भरपूर नुकसान झाले आहे आणि आता त्यात भाव सुद्धा खूप कमी मिळतोय.
advertisement
5/5
आता सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी बातमी आहे. पावसाचा जोर ओसरणार असल्याने शेतकरी सुखावेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Rain Update विदर्भात पावसाचा जोर ओसरला, इथं चेक करा आजचे हवामान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल