OTT Release This Week : या आठवड्यात OTT वर पाहा 7 फिल्म आणि सीरिज; घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Upcoming OTT Releases : ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात नवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातही प्रेक्षकांना फँटेसी, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि रोमांचक अशा विविध जॉनरच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
advertisement
1/7

द विचर सीझन 4 (The Witcher: Season 4) : 'द विचर सीझन 4' येत्या 30 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल. आधीच्या तीन सीझनपेक्षा चौथा सीझन वेगळा असणार आहे.
advertisement
2/7
M3GAN 2.0 : AI तंत्रज्ञानाची उत्तम सांगड असणारा M3GAN 2.0 येत्या 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल.
advertisement
3/7
लोका चॅप्टर 1 : चंद्रा : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर 'लोका चॅप्टर 1 : चंद्रा' ओटीटीवर रिलीज होत आहे. कल्याणी प्रियदर्शन स्टार या चित्रपटात नव्या भारतीय सुपरहिरोची झलक पाहायला मिळते. मनोरंजक कहाणी अतिशय रहस्यमय पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. जिओ हॉटस्टारवर 31 ऑक्टोबरपासून प्रेक्षक हा चित्रपट मल्याळम, तेलुगु, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठीत पाहू शकतात.
advertisement
4/7
रूलर्स ऑफ फॉर्च्यून (Rulers of Fortune) : सत्ता, संघर्ष, विश्वासघात अशा अनेक गोष्टी 'रूलर्स ऑफ फॉर्च्यून' या नव्या क्राइम ड्रामामध्ये पाहायला मिळतील. 29 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
advertisement
5/7
द एसेट (The Asset) : 'द एसेट'मध्ये एका युवा एजेंटची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर 2025 पासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना 'द एसेट' पाहायला मिळेल.
advertisement
6/7
IT : Welcome to Derry : 'आयटी' चित्रपटांची ही बहुप्रतीक्षित प्रीक्वल सीरिज आहे. 27 ऑक्टोबर 2025 पासून जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहायला मिळेल.
advertisement
7/7
इडली कडाई (Idli Kadai) : डडली कडाई या तामिळ कौटुंबिक चित्रपटाचा धनुष हा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. एक तरुण मुलगा आपलं गाव, आई-वडिलांचं इडलीचं छोटं दुकान सोडून परदेशात महागडं रेस्टॉरंट सुरू करतो, असं या चित्रपटाचं कथानक आहे. 29 ऑक्टोबर 2025 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Release This Week : या आठवड्यात OTT वर पाहा 7 फिल्म आणि सीरिज; घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस