फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी? विचित्र हवामानामुळं विदर्भात वाढलं टेन्शन
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Forecast: दिवाळी सुरू होताच राज्यात थंडीची चाहुल लागली आहे. विदर्भात मात्र हवामानाची विचित्र स्थिती कायम आहे.
advertisement
1/5

गेले काही दिवस राज्यात हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झालीये. कधी उन्हाचे चटके, कधी गुलाबी थंडी तर कधी अशा वातावरणामुळे नागरिक त्रासले आहे. ऐन दिवाळीत विदर्भात सुद्धा असंच हवामान कायम आहे.
advertisement
2/5
विदर्भात पहाटे गुलाबी थंडी, दुपारी उन्हाचे चटके काही वेळानंतर ढगाळ वातावरण असा दिवस आहे. यामुळे जनसामान्यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे. सोमवारी विदर्भात स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अमरावती, नागपूर या दोन्ही शहरांमध्ये तापमानात वाढही झाल्याचे दिसून आले.
advertisement
3/5
आज धनत्रयोदशी दिवशी 29 ऑक्टोबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यांत स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.
advertisement
4/5
बुलढाणा, नागपूर या दोन जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. नागपूरमध्ये आज कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असणार आहे.
advertisement
5/5
विदर्भातील अनेक भागांत सोयाबीन पीक अजून काढलेले नाही. अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही शेतात आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची भीती आहे. त्यातच आता थंडीची चाहूल सुद्धा लागलेली आहे. पाऊस, ऊन, थंडी सोबत असल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी? विचित्र हवामानामुळं विदर्भात वाढलं टेन्शन