TRENDING:

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, विदर्भात काय स्थिती? पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट

Last Updated:
Weather Forecast: विदर्भात थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 16 अंशांवर आला आहे. आजचं अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, विदर्भात काय स्थिती? पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळीनंतर गारठा वाढत असतानाच पुन्हा काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झालीये. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
विदर्भात गेल्या दोन दिवसांत थंडीचा जोर वाढलाय. काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअसवर आलाय. पुढील काही दिवसांत विदर्भातील किमान तापमानात आणखी घट होणार असून थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
सध्या विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही. पण, जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होतांना दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, गडचिरोली या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस इतके आहे.
advertisement
4/5
वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे या भागांत थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमान हे 16 अंश सेल्सिअस इतके असल्याने त्या ठिकाणी थंडीचा कडाका जाणवणार आहे.
advertisement
5/5
पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे शेती पिकांना देखील रोगांचा धोका असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, विदर्भात काय स्थिती? पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल