TRENDING:

विदर्भाला हुडहुडी! भंडाऱ्यात पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात आज काय स्थिती?

Last Updated:
Weather Forecast: राज्यात हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. थंडीच्या दिवसांत पावसानं घुसखोरी केली आहे. विदर्भात आज हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
advertisement
1/5
विदर्भाला हुडहुडी! भंडाऱ्यात पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात आज काय स्थिती?
राज्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रानंतर आज मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर विदर्भात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळतेय.
advertisement
2/5
विदर्भात गेल्या तीन दिवसांत थंडीचा कडाका वाढलाय. काही जिल्ह्यांत पारा 14 अंश सेल्सिअसवर आलाय. पुढील काही दिवसांत संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/5
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री थंडीचा कडाका तर दिवसा कडक ऊन जाणवत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या घरात आहे. आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ हवामान राहील.
advertisement
4/5
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 16 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे या भागांत थंडीची तीव्रता जाणवत आहे. तर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि या जिल्ह्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
5/5
विदर्भातील सर्वात कमी तापमान भंडारा जिल्ह्यात आहे. भंडाऱ्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर गोंदियात 15 अंश सेल्सिअस असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. दरम्यान, हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भाला हुडहुडी! भंडाऱ्यात पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात आज काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल