TRENDING:

शेतकऱ्यांची चिंता मिटणार, तो परतणार! विदर्भासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आता हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी आहे.
advertisement
1/5
शेतकऱ्यांची चिंता मिटणार, तो परतणार! विदर्भासाठी IMDचा महत्त्वाचा अलर्ट
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. काही भागात पडतोय तर काही ठिकाणी उन्ह पडताना दिसत आहे. पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडं डोळं लावून बसल्याचं चित्र आहे.
advertisement
2/5
विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आज काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
advertisement
3/5
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. काल, 19 सप्टेंबरला विदर्भातील काही ठिकाणी पाऊस झाला. काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय, तर काही भागांत वातावरण कोरडे होते.
advertisement
4/5
21 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार दिली आहे. तर 23 सप्टेंबरसाठी संपूर्ण विदर्भाला हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, पावासने ओढ दिल्याने काही पिकांना आता अत्यंत पावसाची गरज आहे. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना आता पावसाअभावी पिकं वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. मात्र, 21 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
शेतकऱ्यांची चिंता मिटणार, तो परतणार! विदर्भासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल