विदर्भात तो पुन्हा आलाय! शेतकऱ्यांची चिंता मिटणार, या जिल्ह्यांत जोरदार कोसळणार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याची स्थिती होती. परंतु, आता पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विदर्भातील काही भागात बुधवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी मात्र वातावरण कोरडे आणि सूर्यप्रकाश होता.
advertisement
2/5
आज 19 सप्टेंबरला विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती सह सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि मेघर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
विदर्भात 18 सप्टेंबर पासूनच तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरवात झालेली आहे. आज 19 सप्टेंबरपासून काही भागांत तर 20 सप्टेंबर उर्वरित ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबरसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/5
20 सप्टेंबरनंतर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाने काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र तो पाऊस काही भागांत झाल्याने उर्वरित भागांतील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
advertisement
5/5
काही दिवसांपूर्वी ज्या पावसाने थैमान घातले, तोच पाऊस आता दडी मारून बसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच मोठ्या आशेने पावसाची वाट बघत आहे. या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात तो पुन्हा आलाय! शेतकऱ्यांची चिंता मिटणार, या जिल्ह्यांत जोरदार कोसळणार