TRENDING:

दुहेरी संकट टळलं, आता गुलाबी थंडी! विदर्भात कसं असणार आजचं हवामान?

Last Updated:
Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिट आणि परतीचा पाऊस अशा दुहेरी संकटात सापडलेल्या विदर्भवासीयांना आता दिलासा मिळणार आहे.
advertisement
1/5
दुहेरी संकट टळलं, आता गुलाबी थंडी! विदर्भात कसं असणार आजचं हवामान?
राज्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अशातच आता पाऊस माघारी फिरणार आहे. आज राज्यात सर्व ठिकाणी हवामान कोरडे असणार आहे. विदर्भातूनही परतीचा पाऊस निरोप घेणार आहे आणि हवामान कोरडे असणार आहे. 
advertisement
2/5
गेले काही दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांत चांगला पाऊस झालाय. पावसामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी अजूनही चिंतेत आहे. अशातच आता विदर्भातून परतीचा पाऊस निरोप घेणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
3/5
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये आज 25 ऑक्टोबरला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. त्याचबरोबर अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहणार असून अंशतः ढगाळ असणार आहे.
advertisement
4/5
विदर्भात आता किमान तापमानात घट व्हायला लागली आहे. काही भागांत गुलाबी थंडी जाणवायला सुरवात झाली आहे. विदर्भात ऑक्टोबर हिट आणि परतीचा पाऊस या दुहेरी संकटाने नागरिकांना प्रचंड त्रास दिलाय. आता त्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
advertisement
5/5
विदर्भात पहाटे पहाटे गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. परतीचा पाऊस माघारी फिरणार असल्याचा आनंद सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. काही शेतकऱ्यांची पिकं अजूनही शेतात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
दुहेरी संकट टळलं, आता गुलाबी थंडी! विदर्भात कसं असणार आजचं हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल