TRENDING:

दिलासा नाहीच, तो पुन्हा आला! विदर्भासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Last Updated:
Weather Forecast: विदर्भात परतीचा पाऊस पुन्हा परतला आहे. आज सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
दिलासा नाहीच, तो पुन्हा आला! विदर्भासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
राज्यात परतीचा पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर शुक्रवारी दिलासा देणारी बातमी मिळाली होती. विदर्भातून सुद्धा परतीचा पाऊस निरोप घेणार असल्याची माहिती होती. पण, अशातच आज 26 ऑक्टोबरला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.
advertisement
2/5
शुक्रवारी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला. त्यामुळे आता परतीच्या पावसाने निरोप घेतलाय, असे वाटत होते. पण आज 26 ऑक्टोबरला अचानक विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज 29 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.
advertisement
4/5
गेले काही दिवस विदर्भावर दुहेरी संकट होते. परतीचा पाऊस आणि ऑक्टोबर हीट या दोन्हींमुळे नागरिक त्रासले होते. आता तरी परतीचा पाऊस निरोप घेईल अशी अपेक्षा होती. पण, आज पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
5/5
पावसाची शक्यता असल्याने सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच सोयाबीनचे नुकसान आणि त्यात अजून भर पडणार आहे. सोयाबिन पिकाला योग्य भाव नाही. त्याचबरोबर पावसामुळे काही लोकांचे पिकं अजूनही शेतात आहे. या सर्व संकटावर मात करून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
दिलासा नाहीच, तो पुन्हा आला! विदर्भासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल