TRENDING:

प्रतिक्षा संपणार, आजपासून तो बरसणार! विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

Last Updated:
गेल्या काही पासून दडी मारलेला पाऊस विदर्भात पुन्हा सक्रीय होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
advertisement
1/6
प्रतिक्षा संपणार, आजपासून तो बरसणार! विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हातात आलेली पिके पाण्याअभावी वाया जाण्याची भीती आहे. अशातच हवामान विभागानं खूशखबर दिली आहे. आजपासून पाऊस पुन्हा सक्रीय होणार असून विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
2/6
विदर्भात 21 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तवला होता. 20 सप्टेंबरला विदर्भात ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता. त्यानुसार आता खरोखरच शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. आज काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/6
विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
4/6
विदर्भातील अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
5/6
21 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 23 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/6
विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची अत्यंत गरज होती. कपाशी सारख्या पिकांना हलक्या पावसामुळे फायदे होतील, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
प्रतिक्षा संपणार, आजपासून तो बरसणार! विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल