TRENDING:

काळजी घ्या! विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा धोका

Last Updated:
Weather Forecast: राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून विदर्भात आज पुन्हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
काळजी घ्या! विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा धोका
राज्यात दिवाळीचे वेध लागले असले तरी पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. बुधवारी विदर्भात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र होते. पण आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/5
विदर्भातील काही जिल्ह्यांत आज, 24 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अमरावती, बुलढाणा, भंडारा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
तसेच उर्वरित नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूरमध्ये आज 29 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.
advertisement
4/5
दरम्यान, आक्टोबर हिटचे चटके आणि पाऊस यामुळे नागरिकांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागतोय. तर वातावरणातील बदलांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
advertisement
5/5
विदर्भातील पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने सोयाबीन उत्पदाक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु, पुन्हा पावासाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
काळजी घ्या! विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल