पाडव्याला गुलाबी थंडी! विदर्भात कसं असणार आजचं हवामान? पाहा अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Forecast: विदर्भात आज दिवाळी पाडव्याला हवामानात मोठे बदल होत आहेत. पावसाने विश्रांती घेतली असून आता थंडीचा जोर वाढत आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरडे हवामान बघायला मिळत आहे. पावसाचा जोर कमी होऊन आता थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भातही अशीच स्थिती बघायला मिळत आहे. विदर्भात शुक्रवारी स्वच्छ सूर्यप्रकाश असून नागरिकांना उन्हाचे चटके आणि उकाडा सहन करावा लागलाय.
advertisement
2/5
आज 2 नोव्हेंबर दिपावली पाडव्याला विदर्भातील हवामान कोरडे असणार आहे. पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके यामुळे विदर्भात आता आरोग्याच्या उद्भवत आहे. पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके अशी हवामान स्थिती असणार आहे.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम या सर्व जिल्ह्यांत आज स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. नागपूरमध्ये आज धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
नागपूरमध्ये आज कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. किमान तापमानात घट होत असल्याने आता काही प्रमाणात गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे.
advertisement
5/5
विदर्भातील ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही ओले आहेत, त्यांच्यासाठी हवामान कोरडे असणार ही आनंदाची बातमी आहे. परंतु, हरभरा, गहू लागवड सुरू झाली आहे त्या शेतकऱ्यांना आता पावसाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
पाडव्याला गुलाबी थंडी! विदर्भात कसं असणार आजचं हवामान? पाहा अंदाज