TRENDING:

विदर्भात हुडहुडी! या जिल्ह्यातील तापमानात मोठी घट, जाणून घ्या हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: विदर्भात दिवाळीनंतर वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून आता थंडीचा जोर वाढत आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.  
advertisement
1/5
विदर्भात हुडहुडी! या जिल्ह्यातील तापमानात मोठी घट, जाणून घ्या हवामान अंदाज
दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत किमान तापमानात घट झाली असून सध्या स्वच्छ सूर्यप्रकाश आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाची कुठलीही शक्यता नाही.
advertisement
2/5
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट होताना दिसून येत आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअस इतके आहे. तर गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके आहे.
advertisement
3/5
अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांतील किमान तापमानातही बुधवारपेक्षा घट झाली आहे. येथील किमान तापमान हे 20 अंश सेल्सिअस इतके असून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे विदर्भातील काही शहरांमध्ये सकाळी हलकी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागतं आहे.
advertisement
4/5
विदर्भात आता थंडीचा जोर वाढत असल्याने कपाशी पिकामध्ये बोंड अळी वाढण्यास सुरवात झाली आहे. त्याचबरोबर तूर पिकावर दव जाण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या तुरीला उदळी सुद्धा लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
5/5
बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीसोबतच आरोग्यावर देखील परिणाम होतोय. ऊन आणि थंडीच्या तीव्रतेमुळे अनेक आजार डोके वर काढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात हुडहुडी! या जिल्ह्यातील तापमानात मोठी घट, जाणून घ्या हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल