TRENDING:

Prashant Kortakar: कडक इस्त्रीचा शर्ट अन् चेहऱ्यावर भीती, अखेर कोरटकरला कोल्हापुरात आणला, पाहा PHOTO

Last Updated:
Prashant Kortakar In Kolhapur : प्रशांत कोरटकरला तेलंगणात ताब्यात घेतल्यानंतर आज पोलिसांची टीम त्याला घेऊन कोल्हापुरात दाखल झाली आहे. यावेळी पोलीस ठाण्याजवळ शिवप्रेमींच्या संतापाचा उद्रेक होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त होता.
advertisement
1/7
Photo : कडक इस्त्रीचा शर्ट अन् चेहऱ्यावर भीती, कोरटकरला कोल्हापुरात आणला
तेलंगणातून प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. जुना राजवाडा पोलिसात अटकेची प्रक्रिया पार पडणार आहे.
advertisement
2/7
कोरटकरला पोलीस ठाण्यात आणले तेव्हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
advertisement
3/7
स्काय ब्लू कलरचा शर्ट घातलेला प्रशांत कोरटकर हा महिनाभरापासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
advertisement
4/7
जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये कोरटकरला आणण्यात आले असून अटकेची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे
advertisement
5/7
वैद्यकीय चाचणीनंतर दुपारपर्यंत कोर्टात त्याला दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरटकर याला बेल मिळणार की जेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
advertisement
6/7
छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजामाता यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याने कोरटकर विरोधात शिवप्रेमींमध्ये रोष आहे. त्यामुळे तणावाची स्थिती पाहायला मिळत आहे.
advertisement
7/7
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोरटकरने धमकीचा फोन केला होता. त्यावेळी सावंत यांना धमकी देताना अवमानकारक वक्तव्य केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Prashant Kortakar: कडक इस्त्रीचा शर्ट अन् चेहऱ्यावर भीती, अखेर कोरटकरला कोल्हापुरात आणला, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल