TRENDING:

Nanded Accident: टायर फुटला अन् घात झाला! तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात, घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
Nanded Accident: अर्धापूर शहरात ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात झाला. घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.
advertisement
1/6
टायर फुटला अन् घात झाला! तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात, घटनास्थळावरचे PHOTO
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला अर्धापूर शहरात वनविभागाच्या कार्यालयासमोर नांदेडमध्ये हा भीषण अपघा झाला. एका धावत्या ट्रॅक्टरचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
2/6
या अपघातात तहसीलदार, त्यांचा चालक आणि शिपाई असे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार रेणुकादास देवणीकर हे आपल्या शासकीय कामासाठी गाडीने जात होते.
advertisement
3/6
अर्धापूर शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळून जात असताना, समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरचा टायर मोठा आवाज होऊन फुटला. टायर फुटल्याने ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट तहसीलदारांच्या गाडीवर जाऊन आदळला.
advertisement
4/6
हा अपघात इतका भीषण होता की तहसीलदारांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर, त्यांचा चालक आणि एक शिपाई जखमी झाले आहेत.
advertisement
5/6
तहसीलदार देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
advertisement
6/6
सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून तिघांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nanded Accident: टायर फुटला अन् घात झाला! तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात, घटनास्थळावरचे PHOTO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल