1, 2 नाही, 15 हजारांचा दिवसाला निव्वळ नफा! चहाचा व्यवसाय लय फायद्याचा
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
चहा म्हणजे अनेकजणांचा जीव की प्राण, चहा घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही. दिवसभरातही चहाची तल्लफ आली की मग वेळ पुढे सरकत नाही. टपरीवरचा चहा तर खूप लोकांना आवडतो. काहीजण घरातला चहा नाहीतर एका ठराविक स्पॉटवरचाच चहा घेतात. सातारकर सध्या चंदू चहावाल्याच्या भलतेच प्रेमात आहेत. इथला चहा अतिशय फेमस झालाय, परिणामी चंदू चहावाला त्यातून महिन्याकाठी लाखोंची कमाई करतोय. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
advertisement
1/5

वडापाव, भाजीपाला, चहा हे दिसायला जरी लहान व्यवसाय दिसत असेल तरी त्यातून दिवसाला हजारोंची कमाई होऊ शकते. आपली अस्सल वेगळी चव आणि मार्केटिंगची हटके पद्धत असेल की, आपल्याकडे ग्राहकांची गर्दी व्हायला वेळ लागत नाही. सध्या चंदू चहावाल्यानं सातारकरांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण केलीये.
advertisement
2/5
सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शाहू स्टेडियम परिसरात चंदू चहाचं दुकान आहे. 1972 साली चंद्रकांत शिंदे यांच्या आजोबांनी चंदू चहाची सुरुवात केली. त्यानंतर 1992 साली चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या आजोबांचा चहाचा व्यवसाय नव्या जोमानं, नव्या उमेदीनं सुरू केला. विशेष म्हणजे आजोबांनी जी चहाची चव ठेवली होती, तीच चव कायम ठेवून चंद्रकांत यांनी आजपर्यंत हा व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळला आहे.
advertisement
3/5
जिद्द, चिकाटी आणि एकनिष्ठता या गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर चंद्रकांत यांनी व्यवसायात आपला जम बसवला. आज त्यांच्या दुकानातला चहा पिण्यासाठी केवळ साताऱ्यातून नाही, तर बाहेर गावातूनही लोक आवर्जून येतात.
advertisement
4/5
महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची संख्या वाढली तरी चंद्रकांत यांनी चहाच्या क्वालिटीत तीळभरही कधी फरक पडू दिला नाही. म्हणूनच चहाप्रेमी या चहाच्या अगदी प्रेमात आहेत. इथं दिवसाला शेकडो ग्राहक चहा पितात.
advertisement
5/5
इथल्या 1 कप चहाची किंमत आहे 15 रुपये. चंद्रकांत शिंदे हे दररोज 2 हजारांहून अधिक कप चहा विकतात. त्यातून त्यांना दिवसभरात 15 हजार रुपये केवळ <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/after-father-death-mother-was-in-depression-but-young-daughter-started-these-business-know-her-inspiring-story-mspk-mhkd-1202859.html">नफा</a> मिळतो. परिणामी महिन्याला ते या <a href="https://news18marathi.com/maharashtra/dharashiv/50-years-old-hotel-famous-in-dharashiv-third-generation-also-taking-good-initiative-masd-mhkd-1202872.html">व्यवसायातून</a> लाखो रुपये कमवतात. चहासोबतच ते वडापाव, भजी, मिसळ अशा वेगवेगळ्या <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/famous-panipuri-center-of-satara-pure-maharashrian-taste-msbs-mhij-1203208.html">फास्ट फूड</a>ची विक्रीदेखील करतात. त्यामुळे इथं येणारे ग्राहक चहा पिऊन आनंदी होत असल्याचं चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
1, 2 नाही, 15 हजारांचा दिवसाला निव्वळ नफा! चहाचा व्यवसाय लय फायद्याचा